• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
07 Dec 2017

Chinchwad : तेलही गेले... हाती आली कोट्यवधींची फसवणूक !
ऑनलाइन तेल खरेदी करण्याचे आमिष दाखवून कोटींचा गंडा घालणारे रॅकेट उध्वस्त

दोन नायजेरियन नागरिक आणि एका पत्रकाराचा समावेश

एमपीसी न्यूज - फेसबुकवर फेक प्रोफाईल बनवून ग्राहकांना आयुर्वेदीक तेल खरेदी करून भरपूर नफा कमविण्याचे आमिष दाखवून कोटींचा गंडा घालणा-या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई सायबर गुन्हे शाखेने या प्रकरणी मुंबई सायबर गुन्हे शाखेने पाच जणांना अटक केली असून त्यापैकी दोघे नायजेरियन युवक आहेत.

अमारा ओबीअॅसो रॉबर्ट फ्रॅन्क (वय 30) इकेन अनअॅच्यूक्वू (वय 30) दोघेही मूळ रा. नायजेरिया अशी या परदेशी नागरिकांची नवे असून त्यांना नवी मुंबई खारघर येथूऊन अटक करण्यात आली. तसेच आशिष मोईद्दीन उर्फ राजेश बाबु प्रभाकरन (वय 46 रा.केरळ), रेजी पीआर उर्फ किरण सूर्या उन्नीकृष्णन (वय 36 रा. केरळ), शाहुल अहमद उल्ला हमीद उर्फ रवीकुमार रामकुमार (वय 32 रा. चेन्नई) अशी या आरोपींची नावे असून त्यांना पोलिसानिया अटक केली आहे. यापैकी शाहुल अहमद हा पत्रकार असल्याची माहिती पुढे आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फेसबुकवर फेक प्रोफाईल बनवत त्याद्वारे ते ग्राहकांना फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवत. जो कोणी ती रिक्वेस्ट स्वीकारेल त्याला ते उदारा या आयुर्वेदिक तेलाबद्दल माहिती देऊन या तेलाची खरेदी करुन त्याच्या विक्रीतून मिळणा-या भरघोस नफ्याबद्दल सांगत. एखादा ग्राहक या जाळ्यात फसला की, ते त्याला फोनवरुन संपर्क साधात व त्यांच्या चेन्नई येथील एका बँक खात्यावर रक्कम भरायला सांगत. रक्कम भरल्यानंतर ते फेसबुक खाते, बँक व मेल आयडी बंद करत त्यामुळे फसवणूक केली जात असे.

चिंचवडच्या व्यापा-याची कोटींची फसवणूक

चिंचवड येथील कमलेश बच्छनी (वय.46 रा. चिंचवड) या व्यापा-याला एक कोटी चार लाख रुपयांची अशीच ऑनलाईन फसवणूक करण्यात आली होती. यामध्ये बच्छनी यांनी चेन्नई येथील एका बँक खात्यात पैस भरले होते. पोलिसांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता संबंधित खाते व तेथील पत्ता दोन्ही खोटे असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी अधिक तपास केला असता चेन्नई, केरळ, मुंबई येथे विविध ठिकाणी त्यांनी बँक खाते उघडल्याचे लक्षात आले. ,

पोलिसांनी या दृष्टीने पुढे तपास केला असता आशिष मोईद्दीन उर्फ राजेश बाबु प्रभाकरन, रेजी पीआर उर्फ किरण सूर्या उन्नीकृष्णन, शाहुल अहमद उल्ला हमीद उर्फ रविकुमार रामकुमार या तीन आरोपीना पुणे सायबर गुन्हे पोलिसांनी अटक केली.

24 फेक बँक खाती, बनावट पॅन कार्ड व आधारकार्डाचा सर्रास वापर

या फसवणुकीसाठी चेन्नई, केरळ, मुंबई या परिसरात एकूण 24 बनावट बँक खाती व बनावट पत्ते बनवले होते. त्यासाठी बनावट पॅनकार्ड, बनावट आधारकार्ड बनवून त्याद्वारे बँक खाते उघडले जात होते. त्यासाठी पलानी या इसमाकडून हे कार्ड बनवून घेतले जात होते. फसवणुकीतून बँक खात्यावर जेवढी रक्कम जमा झाली की 4 टक्के रक्कम नायजेरीअन टोळके इतर आरोपींना देत असत. या तपासामध्ये पोलिसांनी 45 चेकबुक, 17 पासबुक, 37 डेबीट कार्ड, 9 मोबाईल, पॅनकार्ड, मतदानकार्ड, प्रेसकार्ड, लॅपटॉप, 13 लाख 40 हजार रुपये रोख, 22 लाख 10 हजार बँक खात्यातील रक्कम असा एकूण 35 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पुणे सायबर सेल गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गजानन पवार करत असून यामध्ये आणखी बरेच फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Read 310 times Last modified on Thursday, 07 December 2017 10:29