• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
07 Dec 2017

Pune : प्रेयसीचे लग्न ठरल्याने फेसबुकवर पोस्ट टाकून तरूणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - प्रेयसीचे लग्न दुस-याच मुलाशी ठरल्याने एका तरुणाने फेसबूकवर आत्महत्या करत असल्याची पोस्ट टाकून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पुणे शहराच्या धानोरी परिसरात घडली असून याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात आत्महत्येची नोंद झाली. रवी रमेशकुमार सोळंकी (32, रा. गुडविल सोसायटी, गोकूळनगर, धानोरी) असे तरुणाचे नाव आहे. 


याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत रवी याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र या मुलीचे दुस-या मुलासोबत लग्न ठरल्यामुळे रवी नैराश्येत होता. अखेर विरह सहन न झाल्याने त्याने फेसबुकद्वारे मित्रांना आत्महत्या करत असल्याचे कळवले आणि गळफास घेत आत्महत्या केली. सपोनि रविकिरण दरवडे तपास करीत आहेत.
Read 89 times