• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
07 Dec 2017

Pimple Gurav : नराधम बापाकडून स्वतःच्या अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार
आरोपीला अटक; दारूच्या नशेत केला अत्याचार

एमपीसी न्यूज- वडिलांनीच पोटच्या अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची दुर्दैवी व धक्कादायक घटना पिंपळे गुरव परिसरात घडली आहे. 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता हा प्रकार घडल्यानंतर पुन्हा बुधवारी (दि.6) पुन्हा घडल्याने पिडीत मुलीच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीनुसार पतीला अटक करण्यात आली आहे.

सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा चालक म्हणून काम करतो. दारूच्या नशेत 30 नोव्हेंबर रोजी बायको कामानिमित्त बाथरुममध्ये गेली असताना त्याने दारूच्या नशेत आपल्या अडीच वर्षाच्या मुलीवर राहत्या घरात अत्याचार केला. बायकोने हा घृणास्पद प्रकार पहिला व पतीला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिलाही मारहाण केली. घडल्या प्रकाराबद्दल कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याचे त्याने धमकी दिली.

त्यामुळे भीतीने पत्नी शांत राहिली. मात्र आरोपीने पुन्हा आपल्या मुलीवर बुधवारी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पत्नीने सांगवी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या नराधम बापाला अटक केली असून त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार व बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम.टी शिंदे करत आहेत.सांगवी पोलीस तपास करत आहेत.

Read 293 times Last modified on Thursday, 07 December 2017 09:43