Shripad Shinde

Shripad Shinde

एमपीसी न्यूज - चिंचवड मधील सेंट्रल मॉलमध्ये येणारे ग्राहक मॉलमध्ये पार्किंगसाठी जागा कमी असल्याने मुख्य रस्त्याच्या तसेच मॉलशेजारी गल्लीमध्ये दिसेल त्या ठिकाणी वाहने लावतात. यामुळे स्थानिक नागिरकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आज (रविवारी) सायंकाळी ग्राहकांनी केलेल्या मनमानी पार्किंगवरून स्थानिकांसोबत वाद झाला.

 

एमपीसी न्यूज - चाकूचा धाक दाखवून तरुणाला लुटले. हा प्रकार फुगेवाडी जकात नाक्याजवळ शनिवारी (दि. 14) रात्री एकच्या सुमारास घडला.

एमपीसी न्यूज - चालू लोकल मधून उडी मारल्याने प्लॅटफॉर्मला धडकून रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या प्रवाशाला गंभीर दुखापत झाली. हा अपघात आज (रविवारी) दुपारी तीनच्या सुमरास चिंचवड रेल्वे स्थानकावर झाला. 

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाला मारहाण करण्यात आली. हा प्रकार मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथे शुक्रवारी (दि. 13) रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. याप्रकरणी 18 वर्षीय तरुणाने वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.<

एमपीसी न्यूज - नापासांची शाळा या माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल नितीन फाकटकर यांना त्यांचे विद्यार्थी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांच्याकडून युवा शिक्षक रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नितीन फाकटकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी हा पुरस्कार देण्यात आला. 

एमपीसी न्यूज - वडगाव कातवी नगरपंचायतची पहिली सार्वत्रिक निवडणूक आहे. या निवडणुकीचे मतदान आज (रविवार) आहे. सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून अशा वातावरणात मतदान उत्स्फूर्त प्रतिसादात सुरु आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत 53.12 टक्के इतके मतदान झाले. 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सक्त कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. शहरात 15 दिवसांच्या फरकाने लगेच दुसरे ऑपरेशन ऑल आऊट करण्यात आले. यामध्ये सुमारे 150 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम आज (शुक्रवारी) रात्री नऊ ते रात्री अकरा वाजेपर्यंत परिमंडळ तीनच्या हद्दीत राबविण्यात आली. 

एमपीसी न्यूज - टेम्पोचा अपघात झाला. याबाबत मालकाला फोनवरून माहिती देत असताना गावक-यांनी टेम्पोतून पडलेल्या 64 हजार 800 रुपयांच्या पाण्याच्या बाटल्या गायब केल्या. हा प्रकार 23 जून रोजी जुना पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला गावाजवळ घडला. याबाबत आज (शुक्रवार) दुपारी एक वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

Page 1 of 88

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us