• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
Administrator2

Administrator2

एमपीसी न्यूज - मावळ भागात होत असलेल्या संततधार पावसामुळे पवना धरणाच्या पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. आज (शनिवारी) सकाळी सहा वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार हायड्रो पॉवर आऊटलेटद्वारे 1394 क्यूसेक या वेगाने तर सांडव्यावरून 1391 क्यूसेक या वेगाने पाणी नदीत सोडण्यात येत आहे. एकूण विसर्ग 2785 क्युसेक्सने होत आहे.

यंदा पवना धरण परिसरात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ होत आहे. शुक्रवारी दिवसभरात 70 मिमी पावसाची नोंद झाली असून एक जूनपासून आजपर्यंत 2262 मिमी पाऊस पवना धरण परिसरात झाला आहे. त्यामुळे पवना धरण 96.35 % इतके भरले असून उपयुक्त पाणी साठा 8.225 टिएमसी इतका झाला आहे.

एमपीसी न्यूज - भाजपच्या प्रभाग क्रमांक एकमधील नगरसेविका किरण जठार यांच्या विरोधात जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर आजोबांचा खोटा शाळा सोडल्याचा दाखला सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज - अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य सरकारच्या नगररचना विभागाने प्रारूप नियमावली, अधिसूचना 21 जुलै रोजी जारी केली आहे. परंतु, बांधकामे नियमित करताना सामान्य नागरिकांना जाचक अटींचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पालिका आणि प्राधिकरणाकडून होणारी अनधिकृत बांधकामावरील कारवाई थांबविण्यात यावी, अशी मागणी संघर्ष समितीने राज्य सरकारडे केली आहे.

एमपीसी न्यूज - सोन्याचे बिस्किट देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलांचे सोन्याचे दागिने पळवणा-या दोघांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळी दोन बनावट सोन्याचे बिस्किट व साखळी जप्त करण्यात आली आहे. अमित पवार याने या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली होती.


एमपीसी न्यूज - शिवसृष्टी प्रकल्प होण्याबाबत कोणाचेही दुमत नाही. मेट्रोच्या डेपोसाठी डीपीआरमध्ये असलेले स्थान याचा विचार करता महामेट्रोचे अधिकारी, पालकमंत्री, इतर पक्षांचे नेते, गटनेते यांना बोलवून चर्चा करूया व त्यातून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी शिवसृष्टी विषयावर आयोजित करण्यात आलेल्या महासभेत स्प्ष्ट केले.

<


पर्यावरण अहवालातून बाब निदर्शनास 

<


एमपीसी न्यूज -विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स, एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा 2017 सालचा, ऐतिहासिक स्वरूपाचा आणि नोबेल शांतता पारितोषिकाच्या धर्तीवर दिला जाणारा ‘तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली जागतिक शांतता पुरस्कार


एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पिंपळेसौदागर येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. आज (शुक्रवारी) केलेल्या कारवाईत पाच पत्राशेड भुईसपाट करण्यात आले.


एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नव्याने करण्यात आलेल्या नवीन दोन क्षेत्रीय कार्यालयांचे क्रांतीदिनी (9 ऑगस्ट) उद्‌घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती सभागृह नेते एकनाथ पवार यांनी आज (शुक्रवारी) पत्रकारांशी बोलताना दिली.

<

Page 10 of 602
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start