• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
Administrator2

Administrator2

एमपीसी न्यूज- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावरील चित्रपट त्वरित प्रदर्शित करावा, या मागणीसाठी सजग नागरिक मंचातर्फे गुरुवारी (1 ऑगस्ट) सह्य़ांची मोहीम राबविण्यात येणार आहे. पुणेकरांच्या सह्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे.

एमपीसी न्यूज- नायगाव (मावळ) येथील वारकरी संप्रदायातील व शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा ज्ञानेश्वर लालगुडे (वय 55)  यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, दीर नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. तळेगांवचे ज्येष्ठ नगरसेवक गणेश भेगडे यांच्या मेव्हणी व  मावळ तालुका पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय लालगुडे पाटील यांच्या त्या भावजय तर वडगाव खडकाळा गट भाजपा उपाध्यक्ष संदीप लालगुडे यांच्या त्या मातोश्री होत.

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवानिमित्त येत्या बुधवारी (दि. 2) रोजी सकाळी ढोल-ताशा पथक/संघ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निगडीतील, भक्ती-शक्ती चौकात बुधवारी सकाळी आठ वाजता या स्पर्धा होणार आहेत.

<

एमपीसी न्यूज: पुणे शहरातील वाहनांची सरासरी गती 30 किलोमीटर प्रति तास अपेक्षित आहे. मात्र पुणे शहरातील रस्त्यांवरून धावणार्‍या वाहनांची सरासरी गती 18 किलोमीटर परिणामी रस्त्यावरील वाहने कासवगतीने धावताना दिसत असून शहरातील वाहतुकीला सामावून घेण्यासाठी रस्तेच अपुरे पडत आहेत, तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे वास्तव महापालिकेच्या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालातून समोर आले आहे.

राज्यात सर्वाधिक वेगाने विस्तारणार्‍या शहरांमध्ये पुण्याचा समावेश होतो. मात्र, शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याने खासगी वाहनांचे प्रमाण अत्यंत वेगाने वाढत आहे. मात्र, वाहतुकीच्या वाढत्या आलेखाला सामावून घेण्यासाठी शहरातील रस्त्यांचा आकार तोकडा पडत आहे.<

चिंचवड मल्याळी समाजमच्या (सीएमएस) सुवर्ण महोत्सवी वर्षाचा समारोप

<

एमपीसी न्यूज - कासारवाडी येथील जे.आर.डी. टाटा उड्डाणपुलाच्या शेजारी बांधण्यात आलेल्या रॅम्प नागरिकांच्या वापरासाठी आठ दिवसात खुला करण्याच्या सूचना महापौर नितीन काळजे यांनी अधिका-यांना दिल्या आहेत.

एमपीसी न्यूज- धक धक गर्ल बॉलिवूडमधली प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या कारकिर्दीवर आधारित लवकरच एक आंतरराष्ट्रीय मालिका येणार आहे. या मालिकेची कार्यकारी निर्माती प्रियांका चोप्रा असून एबीसी स्टुडियोज या मालिकेची निर्मिती करणार आहे.

एमपीसी न्यूज- गोकुळने गायीच्या दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. उद्या १ ऑगस्टपासून हे दर लागू होणार असून ग्राहकांना आता गोकुळचं गायीचं दूध घेण्यासाठी दोन रूपये जास्त मोजावे लागणार आहेत. मात्र म्हशीच्या दूध दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. कोल्हापूरमधील गोकुळ दूध महासंघाने ही दरवाढ केली आहे. त्यामुळे गोकुळ गायीचे दूध 40 रुपये प्रतिलिटर भावाने विकले जाणार आहे.

एमपीसी न्यूज- लायन्स क्लब पुणे औंध - पाषाणच्या अध्यक्षपदी डॉ. सतीश देसाई यांची नुकतीच निवड करण्यात आली. डॉ. सतीश देसाई आणि त्यांच्या कार्यकारिणीतील सदस्यांच्या शपथविधी शनिवारी पुण्यात करण्यात आला.

एमपीसी न्यूज- आर्थिक वर्ष 2016-17 साठी आयकर विवरणपत्र भरण्याचा आज, 31 जुलै शेवटचा दिवस असून ही मुदत वाढवून दिली जाणार नसल्याचे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे. आयकर विभागाकडे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दोन कोटी विवरणपत्रे दाखल झाली असून विवरणपत्र वेळेतच दाखल करण्याचे आवाहन आयकर विभागातर्फे करण्यात आले आहे.

Page 4 of 602
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start