• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
Administrator2

Administrator2


एमपीसी न्यूज - राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि भगवान महावीर शिक्षण संस्था यांच्या वतीने चिंचवड येथे एक दिवसीय चौथे विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन होणार आहे, अशी माहिती परिषदेचे सरचिटणीस शंकर आथरे यांनी दिली.

<


एमपीसी  न्यूज -  नदी प्रदूषण रोखण्यासाठी थेरगाव आणि काळेवाडी परिसरात पवना नदीपात्रालगत असलेले भंगार व्यवसाय बंद करावेत, अशी मागणी शिवसेनेचे रहाटणी-काळेवाडी प्रभागप्रमुख युवराज दाखले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
<


एमपीसी न्यूज - देवाचे स्वरूप कवेत घेऊ पाहणारे शब्द आणि या शब्दांना झेलून सांभाळून ठेवणारी कुपी म्हणजे ग्रंथ. जो ही कुपी सांभाळतो व त्यातील अवीट अमृत आयुष्यभर चाखतो, तोच अमर होत असतो. संतांचे ग्रंथ हे आयुष्यरूपीस मार्गावरील मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नाना काटे यांनी व्यक्त केले.

<


एमपीसी न्यूज - पुणे शहराचा वाढता विस्तार आणि सक्षम नसलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये खासगी वाहने रस्त्यावर येण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यात पुण्यातील लहान रस्ते आणि पार्किंगच्या समस्येमुळे पुणेकरांचा कल दुचाकी खरेदीकडे असल्याचे पाहायला मिळत आहे. सद्यस्तिथीला वाहने 33 लाख 37 हजार 370 वाहने असून त्यातील दुचाकीची संख्या ही 24 लाख 97 हजार 343 वर पोहोचली आहे.

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्राथमिक शाळा रहाटणी क्र.55 या शाळेमध्ये पाठ्यपुस्तकाचे विध्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.  

एमपीसी न्यूज : आज सकाळी महापौर मुक्ता टिळक यांच्या यांच्या हस्ते नव्याने तयार करण्यात आलेल्या parivahan.gov.in या वेबसाइटचे अनावरण करून ऑनलाइन रिक्षा परवान अर्जांना सुरवात करण्यात आली. या वेबसाइटवरून रिक्षा परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

<

एमपीसी न्यूज - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर आक्षेपार्ह लेखन सध्या वॉट्स अप आणि अन्य सोशल माध्यमांमधून फिरत आहे. अपना वतन संघटना व मंगल खाडे यांनी एक निवेदन काढून महामंडळावर आरोप केले आहेत. महामंडळावर विनाकारण चिखलफेक करण्यात येत असून त्याबाबत संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याचे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी सांगितले आहे.

एमपीसी न्यूज - फाईल क्लिअर करण्यासाठी ठेकेदाराच्या भाच्याकडून लाच स्वीकारताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या लेखाधिका-याला लाच लुचपत प्रतिबंधक (एसीबी)च्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (सोमवारी) दुपारी एकच्या सुमारास पालिका मुख्यालयात करण्यात आली.

<

एमपीसी न्यूज- सिंहगडावर जाणाऱ्या घाटात काल (रविवारी) सायंकाळी चारच्या सुमारास दरड कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने सुरक्षारक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आठ दिवस सिंहगड पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

मौजमजेसाठी चोरल्या गाड्या; आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता

<

Page 3 of 602
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start