• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
11 Jul 2017

उच्चरक्तदाबाप्रमाणेच मानसिक तणाव किंवा ताण हा सुद्धा silent killer प्रमाणेच व्यक्तीला हळूहळू मृत्यूकडे घेऊन जातो. या मानसिक तणावाला सामोरे जाताना काय काळजी घेतली पाहिजे, ज्यामुळे आपल्याला निरोगी आयुष्य जगता येईल.

व्यवहारात बघितल्यास आज प्रत्येकालाच कमी जास्त प्रमाणात मानसिक तणाव असतो. मानसिक तणावाची वयोगटाप्रमाणे वेगवेगळी करणे आहेत.

लहान मुलांमध्ये शाळेतील गृहपाठाची, अभ्यासाची, परीक्षेचा, मित्रांमध्ये वावरण्याचा ताण व पौगंडावस्थेत शरीरात होणाऱ्या बदलामुळे नकळत येणार ताण, वजन कमी झाल्याने किंवा वाढल्याने, पालकांच्या विचारांशी शिस्तीशी जुळवून घेण्याचा ताण व तरुण वयात करीयर, नोकरीतील ताण आणि स्पर्धा व प्रौढावस्थेत शारीरिक आजार, आर्थिक विवंचना, अन्य कमतरतेमुळे निर्माण झालेला न्यूनगंड त्याचा ताण व वृद्धावस्थेत दिवसेंदिवस पंचेंद्रियांच्या शक्तीत येणाऱ्या कमजोरीचा ताण, परावलंबनाच्या भीतीने निर्माण होत असलेला ताण. तसेच स्त्रियांमध्ये घर व नौकरी या दोन्ही ठिकाणी तेवढयाच क्षमतेने काम करताना येणार ताण. अशा प्रकारे आयुष्यामध्ये वयाच्या प्रत्येक टप्यात प्रत्येक व्यक्तीला कोणत्यातरी मानसिक तणावाने ग्रासलेले असते. सध्या तर मनुष्याची सहनशक्ती कमी झाल्याने त्याला छोट्या छोट्या गोष्टीचा ताण येतो.

नित्य कामामध्ये कमी प्रमाणात ताण असल्यास तो आपली दैनंदिनी पार पडण्यास उद्युक्त करून उपयुक्तच ठरतो. पण हाच ताण जेव्हा व्यक्तीचे चोवीस तास व सातही दिवस व्यापतो तेव्हा शरीरामधील विविध अंतस्रावी ग्रंथीचे कार्य प्रभावित करून विविध आजारांचा ससेमिरा मनुष्याच्या मागे लागतो. लहान मुलांमध्ये चिडचिड करणे, भूक न लागणे, हट्ट करणे, गुमसुम राहणे व पौगंडावस्थेत अति क्रोध, त्वरित नकारात्मक प्रतिक्रिया देणे, शारीरिक व बौद्धिक वाढ मंदावणे व तरुणांमध्ये बद्धकोष्ठता, आम्लपित्त, थायरॉईडचे आजार (ग्रंथीचा स्त्राव कमी होणे किंवा वाढणे), पोटाचे विकार (इरिटेबल बॉवेल डिसऑर्डर्स), मांसपेशींचे आजार पाठदुखी, मणक्याचे आजार, एकाग्रता कमी होणे, अर्धशिशी किंवा डोकेदुखी, त्वचा विकार, डिप्रेशन, व प्रौढांमध्ये श्वसनाचे विकार, उच्चरक्तदाब, मधुमेह, विस्मरण,सांध्यांचे आजार,चिंता तसेच वृद्धांमध्ये भिती, सतत नकारात्मक विचार निर्माण करतो.

स्त्रियांमध्ये मासिक पाळीचे विविध आजार,व्यंधत्व, पुरुषांमध्ये शुक्राणूंचे प्रमाण कमी होते ते ही व्यंधत्वास कारणीभूत होते. एका प्रसिद्ध नाटकामध्ये सुद्धा ताणामुळे उत्पन्न होणारे विविध प्रश्न मांडले गेले आहेत. मानसिक ताणामुळे व्यक्ति काम करण्याची क्षमता घालवून बसतो, ताणामुळेच नातेसंबंध बिघडतात, निर्णय क्षमता व आत्मविश्वास कमी होतो. ताण वाढल्याने हृदयाचे ठोके जलद गतीने पडतात, श्वासोश्वासाची गती वाढते, व्यक्ति अस्वस्थ होतो.

छोटासा मानसिक ताण मोठमोठ्या व्याधी निर्माण करण्यापूर्वीच त्याचे नियमन करणे आवश्यक आहे. त्याकरिता ध्यान, व्यायाम करणे अपेक्षित असून हा उपाय सर्वतोपरी श्रुत आहे. कोणत्याही व्याधीचे कारण जाणून घेतल्यानंतरच त्यावर उपाय योजना करता येते.

मानसिक ताणाचे थोडया अवधित निर्मूलन करण्याकरिता ३ (तीन) थेरपी महत्वाच्या आहेत. त्यापैकी पहिली थेरपी आहे समुपदेशन. यामध्ये व्यक्ति किंवा रुग्णाला ज्या ज्या बाबींचा ताण येतो त्या बाबींना कसे सामोरे जावे, त्या तणावाचे कसे नियमन करून त्याला दूर करावे याबद्दल मार्गदर्शन केले जाते. कालांतराने व्यक्तीला त्या बाबींचा ताण येणे बंद होते.
दुसरा उपाय म्हणजे अभ्यंग. यामध्ये संपूर्ण शरीराला औषधीयुक्त तेलाने मसाज केले जाते. मसाजाने औषधीयुक्त तेल त्वचेद्वारे शोषून घेतले जाते त्यामुळे रक्तसंचारण्याची प्रक्रिया सुधारते . मेंदूला उत्तम रक्तपुरवठा वाढतो व व्यक्तिच्या शरीर व मनावरचा ताण दूर होऊन उत्साह वाढतो.

तिसरा व महत्वाचा उपाय म्हणजे शिरोधारा. यामध्ये व्यक्तीच्या कपाळावर औषधी काढ्यांची, तेलाची धारा चार अंगुल अंतरावरून विशिष्ट गतीने सतत ४५ ते ६० मिनिट पर्यंत सोडली जाते. त्यामुळे खालील परिणाम दिसून येतात.
१) पिच्युटरी ग्लॅन्ड उत्तेजीत होऊन सेरॉटेनिन, डोपामाइन, मेलाटोनिन स्रवल्याने मानसिक ताण, डिप्रेशन, अनिद्रा दूर होते.
२) एकाग्रता वाढते. ३)संपूर्ण शरीरात संचरण करणाऱ्या वात दोषाचे नियमन करते
४) आज्ञाचक्र , पिच्युटरी ग्लॅन्ड ज्याला तिसरा नेत्र म्हणतात ते उत्तेजित झाल्याने मनुष्याची आंतरिक मनाची शक्ती वाढते.
५) मेंदूतील रक्तसंचरण वाढल्याने स्मरणशक्ति वाढते, कोणतीही बाब लवकर समजते व ते कायम स्वरूपी लक्षात राहते.
६) केसांचे आरोग्य सुधारते, केस गळणे थांबून केसांची लांबी व दृढता वाढवते व पांढरे केस काळे करते.
७) नर्वस सिस्टिम ला आराम व शिथिलता प्रदान करून शांत झोप लागते त्यामुळे शरीर व मन दोन्ही सुदृढ राहते.
८) पंचेंद्रियांची (नाक, कान, घसा, डोळे, त्वचा) संवेदन क्षमता वाढवते व नकारात्मक विचारापासून मुक्ति मिळते.
९) शिरोधारा मानसिक ताणाकरिता सर्वोत्तम उपचार आहे .
याशिवाय आहारात केळी, बीट, गाजर, डाळिंब, पेरू, आवळा, डार्क चॉकलेट खाल्यास मानसिक ताण कमी होण्यास मदत होते.

डॉ. ममता नाकाडे राऊत : ९८५०२४१८८७, ८४८२८४१६९५
पंचकर्म विभाग प्रमुख
डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, पिंपरी

08 Jul 2017


एमपीसी न्यूज - मुलीचा जन्म नको गं बाई... असे वाक्य आयुष्यात एकदा तरी प्रत्येक स्त्रीने म्हटले असेलच. या वाक्याला कारणही तसेच आहे. स्त्रियांना मोकळेपणाने जगताना अडवणूक करणारे अनेक क्षण येतात. त्यातला मुख्य म्हणजे मासिक पाळी, त्यानंतर बाहेर फिरायला गेलात किंवा कामावर असताना स्वच्छतागृहाचा अभाव यामुळे अनेकवेळा स्त्रियांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्याचाच विचार करता गुडफिल या क्रांतिकारी उत्पादनाची निर्मिती झाली.


आता हे उत्पादन काय व ते का तयार करावेसे वाटले त्याची एक छोटीशी कथा अशी की, जेएसआर इनोव्हेटिव्ह या कंपनीच्या शारदा जोशी यांनी व त्यांच्या पतीने गुडफिल हे उत्पादन बनवले, त्याचे कारण असे की त्यांची महाविद्यालयात जाणारी मुलगी अचानक युरीन इन्फेक्शनमुळे त्रासली होती. बाथरुमला जायचे म्हटले तरी तिच्या अंगावर काटा यायचा. आपल्या तरुण वयातील मुलीला होणारा त्रास जोशी दाम्पत्याला पहावला नाही. त्यांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून मुलीसाठी एक इनोव्हेटीव्ह प्रॉडक्ट बनविण्याचा विचार केला. ज्याद्वारे ती कॉलेजमध्ये, ट्रीपला किंवा मैदानावर जरी असली तरी तिला लघवीचा त्रास होणार नाही. यापुढे तिला त्यासाठी बाहेरचे घाणेरडे स्वच्छतागृह वापरायचीच गरज पडू नये, यासाठी त्यांनी एक उत्पादन बनविण्याचा निर्धार केला. यातून त्यांनी अनेक जणांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी रबर मटेरियलचाही विचार केला. मात्र, त्याचे दुष्परिणाम पाहता थेट अमेरिकेहून सिलीकॉन मटेरीअल मागवून त्यांनी  गुडफिल तयार केले.

या गुडफिलिंगचा अनुभव व त्याबद्दल महिलांमध्ये जागरुकता तयार करण्यासाठी शर्मिला महाजन, समृद्धी पैठणकर, सुनीता शिंदे व स्वतः शारदा जोशी यांनी भोसरी येथील इंद्रायणीनगरमधील महिलांना एकत्र केले. यावेळी त्यांनी अगदी महिलांच्या बाहेर फिरायला गेल्यानंतर स्वच्छतागृह नसल्यामुळे होणा-या अडचणींवरून मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्या शंका व प्रश्नानंतर महाजन यांनी गुडफिल या उत्पादनाची माहिती करून दिली. बाहेर गेल्यानंतरही गुडफिलमुळे अगदी स्वच्छतागृहाशिवायही तुम्ही 24 तास राहू शकता, हे पटवून दिले.

मासिकपाळीच्या पुढचे क्रांतकारी पाऊल म्हणूनच खरे तर गुडफिलला पाहिले पाहिजे. कारण महिलावर्गाला अगदी नावाप्रमाणे गुड फिलिंग देणारे हे साधन आहे. लाज व अपु-या सोयी-सुविधांमुळे महिलावर्गाला येणा-या अडचणीवर याद्वारे मात करता येणार आहे, असेही महाजन यांनी यावेळी सांगितले.

तर याची वैशिष्ट्ये सांगताना शारदा जोशी म्हणाल्या की, प्रथमतः हे प्रॉडक्ट पूर्णपणे डॉक्टर मान्य आहे. याचा वापर केवळ बाहेर जातानाच नाही तर कामावर, कॉलेज अशा ठिकाणी किंवा घरातील वयस्क सदस्यांना ज्यांना बिछान्यावरून उठणेही शक्य होणार नाही अशांसाठी, मोठ्या ट्रेकींग किंवा ट्रीपसाठी, अजारीव्यक्तीसाठी, गर्भवती स्त्रियांसाठी करता येणार आहे. शिवाय हे वॉशेबल आहे, टिकाऊ आहे.
याद्वारे कोणतीही अॅलर्जी होणार नाही, असेही सांगितले. हे ऑनलाईनही उपलब्ध आहे. शिवाय ते आपल्या पिंपरी-चिंचवडमध्येच तयार होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसारही त्याची निर्मिती करून मागवू शकता.

गुडफिलमुळे आता महिलांनी बाहेर असताना पाणी कमी पिणे, कंट्रोल करणे व त्यातून होणारे इनफेक्शन याला आता कायमचा टाटा बाय-बाय करायला हरकत नाही.या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण www.goodfeel.net.in या वेबसाईटला भेट देऊ शकता, This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. वर ई-मेल करू शकता किंवा 9027223224 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.

Page 1 of 5