• IMG-20170812-WA0103.jpg
  • MPC_news.JPG
20 Aug 2017


(शर्मिला पवार)


एमपीसी न्यूज - श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येथी सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे बालकवीच्या या काव्यपंक्तीचा याची देही याची डोळा अनुभव घ्यायचा असेल तर मावळ सारखे दुसरे ठिकाण नाही. भात शेती, विशाल पसरलेला सह्याद्री अन त्याच्या कुशीत वसलेली छोटी-छोटी गाव. सगळ कसे चित्रातल्या सारखे...अशाच एका चित्रातल्या गावी म्हणजे येलघोल लेणी बघण्याचा 15 ऑगस्टच्या सुट्टी निमित्त जाण्याचा योग आला.... पुण्यापासून अवघ्या 50 किमी अंतरावरचे.

पवनामाईचे विशाल व शांत पात्राचे मनसोक्त दर्शन या प्रत्येक गावाच्या वळणावर पाहायला मिळाले. नदीकाठी, उतारावर भातशेती डोलात झुलत होती. अन त्यांच्याबरोबर गवत फूल सुद्धा...हिरव्यारंगात भडक गुलाबी, पिवळी, लाल अशी फूलं उठून दिसत होती. त्या दिवशी पाऊस नव्हता त्यामुळे निसर्गसुख मनसोक्त डोळ्यांना अनुभवता येत होते.

कामशेतपासून अवघ्या 14 ते 16 किमी अतरांवर येलघोल वसले आहे. नाव नवखं होतं पण म्हटलं जाऊन तर बघू. कामशेत कडदे करत आर्डव व नंतर येलघोल असा प्रवास, रस्ता खडकाळ व खड्यांचा होता. मात्र रस्त्यात येणारी वळण, ओढे, त्यावरील पूल, गावातील टुमदार शिखर पाहताना खड्डे जाणवेणासे झाले. त्यात गोकुळाष्टमी प्रत्येकगावात भजनाचे व दहीहंडीचे कार्यक्रम मग काय हलगी व भजनांचा आवाज त्या हिरवाईत स्वर्ग सूख देणारा होता. झेंडावंदन संपवून बच्चे कंपनी व गावकरी दहीहंडीच्या तयारीला लागले होते.

आम्ही त्यांना बघत बघत येलघोल गावात पोहोचलो. गावात सिमेंटचा रस्ता होता. गाव तसे 60 ते 70 घरांचेच पण शहरी कटकटीपासून दूर त्यामुळे शांत व सुंदर वाटले. गाड्या लेणीपर्यंत जात नाहीत. असे गावक-यांनी सांगितल्याने आम्ही गाड्या एका बंधा-याजवळ थांबवून पायी भातशेतीच्या बांधावरुन निघालो. डोळ्याला विश्वास बसणार नाही एवढी सूंदर गवत फूलं मी तिथे पाहिली. पर्यटक इकडे असून फिरकत नाहीत. त्यामुळे तिथे केवळ मोरांचा व आमचाच आवाज होता. ओढ्यावर कपडे धुणा-या बायकांना रस्ता विचारत आम्ही लेणीजवळ पोहोचलो. एक सूंदर धबधबा व एक गुहा असे या लेणीचे स्वरुप आहे. आत नाही म्हणायला चार आकृती कोरल्या आहेत. मात्र तेही अर्धवटच पण निसर्गामुळे ते अर्धवटपण जाणवलं नाही.

आम्ही मनसोक्त त्या हिरवळीवर फिरलो, उंचावरून गाव अजूनच लोभस वाटत होत. तर नजरेच्या एका कटाक्षात ढगात बुडालेला विसापूर, लोहगड व तिकोण्याचाही सुळका दिसत होता. सावलीला लपंडाव चालू होता. मोरांचा अवाज संपूर्ण परिसरात घुमत होता. कोणत्याही संगीताशिवाय सर्व पिके, गवत व झाडं एका लयीत डुलत होती. धबधब्यातून पडणारे पाणी त्याला साथ देत होते. निरव शांतता काय असते ते येथे आल्यानंतर ख-या अर्थाने अनुभवायला मिळते. 

विकास व पर्यटकांपासून दूर असणारे येलघोल निसर्गप्रेमींना नक्की आवडण्यासारखे आहे. येथे तुम्ही दुचाकी किंवा कारने जाऊ शकता. खाण्यासाठी कामशेतचाच अधार आहे. मात्र निसर्गाची भूक भागवण्यासाठी जागो-जागी हिरवळ, फुले व नदी ओढ्याचे पाणी भरपूर आहे. त्यामुळे जमल तर वाटवाकडी करून जाऊन जा 'येलघोल' ला...

yelghol 11
IMG 20170815 114410
yelghol 5
yelghol 3
yelghol 14
yelghol 18
IMG 20170815 124051
yelghol 1
yelghol 9
yelghol 10
yelghol 12
yelghol 13
IMG 20170816 WA0005
IMG 20170816 WA0019
IMG 20170816 WA0027
16 Aug 2017


एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील भंडारा डोंगराच्या पायथ्याशी वसलेले तीर्थक्षेत्र सुदुंबरे गावातील श्री सिद्धेश्वर मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. हे सिद्धेश्वर मंदिर वास्तुकलेचा सुंदर नमुना म्हणून ओळखले जात आहे.

हे मंदिर सुदुंबरेकर ग्रामस्थांबरोबर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचे देखील श्रद्धास्थान आहे. मंदिरातील गर्भ गृहाचे कोरीव काम पाहताना कोणीही थक्क होते. तीन टप्प्यामध्ये असणारे हे मंदिर आपल्या शिल्पकलेमुळे सुदुंबरे गावच्या वैभवात आणि नावलौकिकात भर टाकत आहे.

पहिल्या टप्प्यात नंदी व त्यावर असणारा कळस, दुस-या टप्प्यात गर्भगृह व तिसरा टप्पा गाभारा म्हणून ओळखला जातो. दर्शनी भागात असणारा नंदी पुरातन शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. काळ्या पाषाणातील हे कोरीव काम मनाला मोहून टाकते. गर्भगृह गाभा-याला दोन गवाक्षे आहेत, जाळीदार गवाक्षामुळे मंदिरात हवा चांगली खेळती राहते. त्यामुळे मंदिरातील वातावरण नेहमीच प्रसन्न, आल्हादायक व थंड असते.

मंदिराचा मुख्य भाग म्हणजे गाभा-यात बरोबर मध्यभागी शिवलिंग आहे. त्यामागे दोन देवतांची सुबक अशा मूर्ती आहेत. मंदिरासमोर सुमारे 200 वर्षांपूर्वीचा महाकाय पिंपळ वृक्ष असून तो चांगला सुबक दगडी चौथ-यात उभा आहे. श्रावणी सोमवार व महाशिवरात्री  काळात या ठिकाणी पंचक्रोशीतील भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते. मंदिरातील देखभाल गावातील तरुण व ग्रामस्थ मोठ्या सेवाभावीरूपाने करत असतात.
2 1

Page 1 of 5